Maharashtra247

सावेडी परिसरातील महिला व मुलींसाठी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर नगरसेविका दिपालीताई बारस्कर

 

अहमदनगर (दि.२ सप्टेंबर):-सामाजिक कार्यकर्ते श्री.बाळासाहेब बारस्कर व नगरसेविका सौ.दिपालीताई बारस्कर आयोजित श्रावणी सोमवार निमित्त सावेडी परिसरातील महिला व मुलींसाठी तज्ञ डॉक्टरांकडून सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी भोलेश्वर मंदिर ढवन वस्ती येथे सकाळी १० ते ४ वा.पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.

यामध्ये ब्लड प्रेशर,ब्लड शुगर,ईसीजी,रक्तातील साखर हिमोग्लोबिन,थायरॉईड,दात साफ करणे,रूट कॅनल,दात काढणे,कृत्रिम दात बसवणे, दात किडन्यापासून वाचवणे, वेडे वाकडे दात सरळ करणे,इत्यादी तपासणी केल्या जातील तसेच यामध्ये तीस टक्के ही सूट मिळणार आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. तरी परिसरातील सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब बारस्कर मित्र मंडळ व नगरसेविका सौ. दिपालीताई बारस्कर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page