Maharashtra247

भिंगार शहरात श्री‌.जाहरविर गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा मिरवणूक मार्गावर सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यास निवेदन 

 

अहमदनगर (दि.२ सप्टेंबर):-भिंगार शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री.जाहरविर गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा पारंपारिक धार्मिक पद्धतीने व आनंद उत्साहाने सण साजरा करण्यात येणार आहे.भिगार शहरामध्ये भगवान श्री.जाहरविर गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा भिंगार येथील मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात काढण्यात येते.

सदर शोभायात्रे मध्ये महिला,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले,इतर समाजातील लोक व बाहेर गावातील येणाऱ्या भाविक आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने मिरवणुकी मध्ये सहभागी होत असतात.सध्या नगर व भिंगार शहरामध्ये प्रत्येक धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक मध्ये अनुचित प्रकार व घटना घडलेल्या आहे.सध्याची शहराची परिस्थिती खुपच खराब झाली आहे.या बाबती कडे आपण गांभीर्याने विचार करून येणाऱ्या गुरुवार ७ सप्टेंबर रोजी भगवान श्री.जाहरविर गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा मध्ये अशी कोणत्याही प्रकारची घटना घडू नये.तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अश्या जातीयवादी प्रकारच्या समाज कंटाकावर पोलीस प्रशासनाची करडी नजर ठेवण्या करीता शोभायात्रा मध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये‌.

तसेच नगर शहराच वातावरण देखील बिघडू नये.या सर्व बाबतीचा विचार करून येणाऱ्या भगवान श्री‌.जाहरविर गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा मध्ये मिरवणूक मार्गावर सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ देण्यात यावे.अश्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना देण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हाउपाध्यक्ष राहुल लखन,सल्लागार प्रशांत पाटोळे,जिल्हा सचिव विक्रम चौहान (सर),सामाजिक कार्यकर्ते तालेवार गोहेर,पवन सेवक,दिपक नकवाल,धिरज बैद,संजय खरे,आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page