Maharashtra247

कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलीसांनी केली सुटका

 

अहमदनगर (दि.१ सप्टेंबर):-कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलीसांनी सुटका करून जीवदान दिले.बातमीची हकीकत अशी की,दि.३१ ऑगस्ट रोजी दुपारी पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील ०४ नंबर शाळेच्या भिंतीच्या आडोश्याला कुठल्याही चारा पाण्याची सोय न करता,काही गोवंशीय जनावरे कत्तल करणे कामी डांबुन ठेवले आहेत.

अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे अंमलदारांना झेंडीगेट परिसरातील नमुद ठिकाणी जावून खात्री करण्यास सांगितले असता, सदर ठिकाणी इसम नामे. फैजान इद्रिस कुरैशी याने १) एक पांढऱ्या रंगाची कालवड २) एक काळया पांढऱ्या रंगाचा बैल ३)एक पांढऱ्या रंगाचा बैल असे एकुण ५०,०००/- रुपये किंमतीचे जिवंत गोवंशीय जनावरे डांबुन ठेवून त्यांना अमानुषपणे वागवुन त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्यासाठी बांधुन ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकुन सदर गोवंशीय जनावरे ताब्यात घेवून त्याचे विरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं १०१८ / २०२३ भादंवि महाराष्ट्र प्राणी सरंक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(ब) ९ सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/संतोष बनकर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकाडे सोो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव सह पथकाचे अंमलदार पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/रियाज इनामदार,पोकॉ/अमोल गाडे, पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकॉ/सुजय हिवाळे,यांनी केली आहे.

You cannot copy content of this page