श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.४ सप्टेंबर):-दारु पिण्यास पैसे न दिल्याने बापाचा खुन करण्याऱ्या आरोपी मुलास श्रीरामपूर शहर पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. बातमीतील हकीकत आशिकी,दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वा.चे सुमारास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,यातील आरोपी बबलु दिलीप शेळके हा त्याचे वडील दिलीप साहेबराव शेळके (रा. गोंधवणी,वार्ड नं.01, श्रीरामपूर) यांना 31 ऑगस्ट रोजी रात्री दारु पिण्याकरीता पैसे मागत होता त्यांनी पैसे न दिल्याने त्यांना आरोपीने मारहान केली व त्यामध्ये ते बेशुध्द पडलेले आहेत.
अशी माहिती मिळाल्याने पोनि.हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथकास त्या ठिकाणी जावुन खात्री करुन सदर आरोपीस ताब्यात घेण्याचे व बेशुध्द इसम दिलीप शेळके यांना औषध उपचाराकरीता घेवुन जाण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तपास पथकास पाहुन रेकॉर्ड वरील आरोपी बबलु दिलीप शेळके हा पळुन जावु लागला असता तपास पथकाने पाठलाग करुन त्यास शिताफिने पकडले तसेच बेशुध्द पडलेले दिलीप साहेबराव शेळके यांना नातेवाईकांचे मदतीने औषध उपचारकरीता साखर कामगार हॉस्पीटल येथे पाठवले असता तेथिल डॉक्टरांनी त्यांना दाखलपुर्व मयत घोषीत केले.
या घटने बाबत आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने वडिलांनी मला दारु पिण्याकरीता पैसे दिले नाहीत तसेच मला दारु पिण्याकरीता घरातील भांडी विकु दिले नाहीत.म्हणुन मी त्यांच्या डोक्यात,छातीवर व गळयावर मारहाण करुन त्यांना जीवे ठार मारले अशी कबुली दिल्याने त्याच्यावर गुरनं.929/2023 भादंविक 302 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयात त्यास तात्काळ अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी,तपास पथकातील सपोनि/जीवन बोरसे,पोसई/ दादाभाई मगरे,पोहेकॉ/ रघुनाथ खेडकर,पोना/रघुवीर कारखेले,पोकॉ/राहुल नरवडे,पोकॉ/गौतम लगड, पोकॉ/गणेश गावडे,पोकॉ/ रमिझराजा अत्तार,पोकॉ/ मच्छिद्र कातखडे,पोकॉ/ संभाजी खरात,पोकॉ/आदिनाथ आंधळे यांनी केली.
