महिला उमेदवाराच्या पतीला देशी विदेशी दारू घेऊन फिरत असताना ८ लाख ५७० रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी पकडले
संगमनेर प्रतिनिधी (दि.१८.डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील साकुर येथे देशी विदेशी दारू घेऊन फिरताना महिला उमेदवाराच्या पतीला ८ लाख ५७० रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना ग्रामपंचायत मतदानाच्या दिवशीच रविवारी १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता घडली आहे घडली आहे.यात विदेशी रॉयल चॅलेंज बॉटल,विदेशी रॉयल स्टॅग,संत्रा देशी दारू , टाटा मोटर्सची लाल रंगाची MH-17-C-9295 नंबरची चारचाकी गाडी असा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.यामध्ये आरोपी शांताराम पोपट गाडेकर (रा.साकुर,ता.संगमनेर) ऋषीकेश संजय गाडेकर या दोघांवर विविध कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पो.कॉ.डी.एस.वायाळ करत आहे.