अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८. डिसेंबर):-जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला असून आज रविवार दि.१८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान तालुक्यांमध्ये मतदान झाले.सर्व ग्रामपंचायत निवडणूका भयमुक्त वातावरणात होण्याकरीता जिल्हयातील सर्व तालुक्यातील अवैध मद्यावर प्रभावीपणे कारवाया करण्यांबाबत सर्व क्षेत्रीय विभागाना तसेच भरारी पथकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला होता.निवडणुकीच्या अनुषंगाने दि.१५.डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत जिल्हयातील अवैध मद्यविक्री,निर्मिती तसेच वाहतुक व हातभटटी दारु,अवैध ताडी विक्री निर्मिती,अवैध मद्यविक्री करणारे हॉटेल्स,ढाबे, इत्यादींवर उत्पादन शुल्क विभागाने छापा मारून गुन्हा दाखल करण्याचे कामकाज केले आहे.सदर कालावधीत विशेष मोहिमा राबविण्यांत आलेल्या असून प्रभावी कारवाई करीता विशेष पथके तयार करण्यांत आलेली होती.ग्रामपंचायत निवडणूकीचे अनुषंगाने जिल्हयात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध मद्यावर एकूण ४२ गुन्हे नोंद करुन ४२ आरोपीना अटक करण्यांत आलेली आहे.त्यात देशी दारु २५०.०२ ब.लि.विदेशी दारु १०१.२८ ब.लि.रसायन ४०० लि.हातभटटी दारु २२९ लि.ताडी २०५ लि.जप्त वाहने संख्या ७ (१ चारचाकी वाहन,६ दुचाकी वाहने ) असा एकूण रुपये ११,६८,२७४ /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यांत आलेला आहे.
Trending Topics:
Trending
- लोकराजाला वंदन! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रकडून राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन
- अवैध वाळू माफियांनी पोलिसांच्याच अंगावर घातला थेट जेसीबी,कुठे घडली घटना वाचा सविस्तर
- मोहरमच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४३२ जण तडीपार पोलिसांच्या ‘त्या’ लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे? शहरात छावणीचे स्वरूप:ड्रोन कॅमेरे,कोम्बिंग ऑपरेशन आणि तगडा बंदोबस्त शांतता भंग केल्यास आता खैर नाही..
- एकाच छताखाली ५० जणांची मोफत रक्त तपासणी;जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण सुरक्षा केंद्राचा पिंपळगाव माळवीत मोठा उपक्रम..!
- संगमनेर बसस्थानकावर सापडलेल्या ‘त्या’ वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू..पण वारसदार गायब..ओळख पटविण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन..
- गुन्हेगारांपेक्षा पोलीस दोन पावले पुढे..! तोफखाना पोलिसांनी दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरांना कसं जेरबंद केलं? वाचा सविस्तर!”
- नेवासा येथील दोघांचे गुन्ह्यात बळजबरीने नाव टाकल्याचे प्रकरण भोवले;राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पीएसआय राजेंद्र वाघ निलंबित!
