Maharashtra247

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ८१.७१ टक्के झाले मतदान २० डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील एकूण २०३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यापैकी ११ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने १९५ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.१८ डिसेंबर) ला मतदान झाले.या ग्रामपंचायतींसाठी ८१.७१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.१६६२ जागांसाठी निवडणूक झाली असून जनतेतून सरपंच तसेच सदस्यांची निवड होणार आहे. २०३ ग्रामपंचायतीमधील १ हजार ९६५ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.त्यापैकी ३०१ जागा बिनविरोध झाल्या आहेत.१ हजार ६६२ जागांसाठी निवडणूक सुरू आहे.१५ सरपंच बिनविरोध झाल्याने १८८ सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.मंगळवारी दि.२० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीत चार लाख ६१ हजार ९१२ मतदार होते.त्यापैकी तीन लाख ७७ हजार ४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यात एक लाख ७९ हजार ८१५ स्त्री मतदार, एक लाख ९७ हजार ६१९ पुरुष मतदार तर इतर दोन मतदारांचा समावेश आहे. तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

You cannot copy content of this page