
अहमदनगर (दि.१७ सप्टेंबर):-हार्मनी किड्स स्कूल येथे हिंदी कविता पठण कार्यक्रम उत्साहात पार पडला.जागतिक हिंदी दिवसाचे ओचित्य साधून हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथे हार्मनी प्री प्रायमरी स्कूलने हिंदी कविता पठनाचा कार्यक्रम घेतला.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या ज्येष्ठ हिंदी शिक्षिका शिला बडेकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात एलिझाबेथ वाघमारे यांनी करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून तसेच हिंदी दिवसाचे महत्त्व सांगून केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली निरखे यांनी केले.या कार्यक्रमात अनेक मुलांनी सहभाग नोंदविला व हिंदी भाषेमध्ये कविता म्हणून दाखवल्या या स्पर्धेमध्ये देवा विनायक टकले नर्सरी याने प्रथम क्रमांक मिळवला तर एल.के.जी क्लासमध्ये गार्गी संकेत शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळविला तसेच यु.के.जी क्लासमध्ये रुद्राक्ष सचिन गीते याने प्रथम क्रमांक मिळविला तसेच स्वरा बिरू होळकर व आरुष सचिन गीते यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाचा समारोप भाविषा वादवानी यांनी केला. या कार्यक्रमांमध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांचे जेष्ठ हिंदी शिक्षक अशोक पाटोळे तसेच शाळेचे प्राचार्य अशोक बेरड यांनी अभिनंदन केले.