Maharashtra247

एमआयडीसी परीसरातुन वाहनांच्या बॅटरीची चोरी करणारे दोन सराईत चोरटे गजाआड एमआयडीसी पोलिसांची कारवाई

अहमदनगर (दि.१८ सप्टेंबर):-एमआयडीसी परीसरातुन वाहनांच्या बॅटरीची चोरी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून वीस हजार रु. किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

बातमीतील हकीकत अशी की,दि.18 सप्टेंबर रोजी फिर्यादी नामे प्रकाश बबनराव डोंगरे (रा. आनंद विहार प्लॅट नंबर 201 नवनागापुर ता.जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की,दि.17 ते 18 सप्टेंबर रोजी रात्री घरासमोर लावलेला ट्रॅक्टर नंबर एमएच 16 बी एच 4395 ची 6000/- रु.किमतीची एक्साईड कंपनीची बॅटरी तसेच 14,000/- रु किमतीचे 20 फुट लांबीचे गोलाकार 7 लोखंडी पाईप असा एकुण 20,000/- रु किमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला.या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजिनं 864/2023 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) शाम विरेंद्रकुमार त्रिवेदी रा.नवगस्ता जि.कानपुर उत्तरप्रदेश हल्ली राहणार गांधीनगर बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर २) बाळु भगवान डोंगरे रा.तरडगव्हाण ता.शिरुर कासार जि.बीड हल्ली राहणार रेणुकानगर नागापुर ता.जि. अहमदनगर यांनी केला आहे.त्यानुसार सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीना शिताफीने पकडले.

त्यांच्याकडे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.तसेच त्यांचे कडुन २०,०००/- रु किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपत भोसले यांचे मार्गदर्शानाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि/राजेंद्र सानप,पोना/गणेश पालवे, पोना/राजेंद्र सुद्रीक,पोना/बंडू भागवत,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/नवनाथ दहिफळे,पोकॉ/सुरज देशमुख यांनी केली आहे.

You cannot copy content of this page