Maharashtra247

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई तिघांवर गुन्हा दाखल पाच लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त 

अहमदनगर (दि.१८ सप्टेंबर):-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील मढी फाटा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसपींच्या राकेश ओला यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पथक अवैध वाळूविक्री व वाहतुकीची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की,देरडे फाटा ते कोळपेवाडी रोडने मढी शिवार (ता.कोपरगाव) या ठिकाणी रस्त्यावर एका विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर विनापरवाना वाळूने भरून येणार आहे.त्यांनी पथकास तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या.पथकाने सापळा रचून संशयित ट्रॅक्टरची तपासणी केली असता विचारपूस करता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैधरित्या वाळू भरून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनात आले.

याबाबत ट्रॅक्टर चालक तुषार रोकडे यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने गणेश काटे व विकी सरोदे (दोघे रा. कोपरगांव) यांच्या सांगण्यावरून गोदावरी नदीपात्रातून उत्खनन करुन वाळू आणलेली असून ते दोघे वाळू धंद्यामध्ये पार्टनर असल्याचे सांगितले.पथकाने ट्रॅक्टरसह पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा जप्तके ला.या प्रकरणी तिघांविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९,३४ सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/सचिन अडबल,पोकॉ/ रणजित जाधव,पोकॉ/ जालिंदर माने,पोकॉ/आकाश राजेंद्र काळे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page