स्नेहालय संपुर्ण सुरक्षा केंद्र आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;आरोग्य चांगले राहण्यासाठी दर तीन महिन्यांनी रक्ताच्या तपासण्या करणे गरजेचे नगरसेवक मनोज कोतकर
अहमदनगर (दि.१९ सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,जिल्हा रुग्णालय अहमदनगर, स्नेहालय संपूर्ण सुरक्षा केंद्र अहमदनगर,एकात्मिक सल्ला व समुपदेशन तपासणी केंद्र, ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिरात १५० ते २०० रुग्णांची मोफत तपासणी व मोफत उपचार देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेवक मनोज कोतकर, सामाजिक कार्यकर्ते अजित कोतकर,राहुल दौंडे सर समुपदेशक,वाळू इदे सर समुपदेशक,सौ.प्रांजली झांबरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सागर फुलारी संपुर्ण सुरक्षा केंद्र प्रकल्प व्यवस्थापक,वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख संपुर्ण सुरक्षा केंद्र,अण्णासाहेब शिंदे,रावसाहेब मतकर, नवनाथ कोतकर,प्रा.प्रसाद जमदाडे ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस,आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिराप्रसंगी बोलताना नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की धकाधकीच्या जीवनात माणूस आरोग्याकडे कमी लक्ष देत आहे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दर तीन महिन्यांनी रक्ताच्या तपासण्या करणे गरजेचे आहे.सध्या आरोग्य सेवा महागडी होत चालली आहे.जिल्हा रुग्णालयामार्फत मोफत औषधे व उपचार दिले जातात याचा फायदा गरजू व गरिबांनी घेणे गरजेचे आहे,व आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्वतःने स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले.
यावेळी रुग्णांशी बोलताना एकात्मिक सल्ला समुपदेशन तपासणी केंद्र समुपदेशक,राहूल दौंडे सर,वाळू इदे सर,सागर फुलारी यांनी रुग्णांना आरोग्य व तपासणी बाबत समुपदेशन केले.तसेच एच.आय.व्ही/ एडस् बाबत कश्या प्रकारे प्रतिबंध करू शकतो.आति जोखीम वर्तन करत असलेल्या व्यक्तींने नियमित रक्त तपासणी केली पाहिजे या वर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच रक्त तपासणी बाबत कोणकोणत्या चाचण्या केल्या जातील याबाबत प्रांजली झांबरे मॅडम प्रयोगशाळा तंत्रज्ञ,अरबाज शेख,यांनी माहिती दिली . एकूण शिबिरांत १२८ लोकांनी रक्ताच्या विविध चाचण्या केल्या.थायरॉईड, उच्च रक्तदाब,मधुमेह,लिव्हर विकार,वजन,उंची,कावीळ, फुफुसाचे विकार,दमा, निमोनिया,संसर्गजन्य आजार डेंगू,मलेरिया,एच.आय.व्ही, गुप्तरोग,किडनीचे टेस्ट, कॅन्सर,सिरम कॅल्शियम, शुगर,हिमोग्लोबिन,इत्यादी मोफत रक्त तपासणी केल्या गेल्या.
अपनी सुरक्षा अपने हाथ संपुर्ण सुरक्षा केंद्र के साथ….
शिबिर यशस्वीते साठी जिल्हा रुग्णालय टीम व नगरसेवक मनोज कोतकर,जालिंदर कोतकर,बाळासाहेब कोतकर,मधुकर चिपाडे,भैरू कोतकर,अजित कोतकर,अण्णासाहेब शिंदे,रावसाहेब मतकर,नवनाथ कोतकर, कोंडीराम वीरकर,अजिंक्य कोतकर,प्रशांत काळोखे, यांनी परिश्रम घेतले तर प्रा.प्रसाद जमदाडे यांनी आभार व्यक्त केले.