आक्षेपार्ह फलक हातात घेऊन नाचुन दोन समाजात तेढ निर्माण करणारा इसम जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
अहमदनगर (दि.१९ सप्टेंबर):-नगर शहरात आक्षेपार्ह फलक घेऊन नाचुन दोन समाजात तेढ निर्माण करणा-या इसमास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले.या बाबत माहिती अशी की,
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन यांनी सरफराज मोहम्मद इब्राहीम सय्यद उर्फ सरफराज जहागीरदार रा. मेहराज मस्जीद जवळ मुकुंदनगर यांच्या विरूद्ध उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील नगर भाग यांचेकडे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्यांनी हद्दपार आदेश पारीत केल्याने वरील इसमास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आल्याचा आदेश भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने वरील इसमास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले बाबत च्या आदेशाची बजावणी करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोस्टेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे,सफौ/कैलास सोनार,पोहेकॉ/संदीप घोडके, पोहेकॉ/रेवननाथ दहीफळे, पोना/दिपक शिंदे,पोकॉ/अमोल आव्हाड,पोकॉ/समिर शेख यांनी केली आहे.