
अहमदनगर (दि.२५ सप्टेंबर):-जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांना आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध गावठी हातभट्टी विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
नमूद आदेशा प्रमाणे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध विदेशी दारु व गावठी हातभट्टीवर छापेमारी केली असून या कारवाईत ६ लाख ७५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला.व एकूण १५ आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पथकाने कोतवाली, कोपरगाव तालुका,श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली.
यामध्ये ७७० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु,११,९०० लिटर कच्चे रसायन व हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधने असा लाखोंचा मुद्देमाल नष्ट केला. प्रकाश पार्थनाथ रॉय, नंदाबाई दादा काळे,राहुल माणिक जाधव,दिनकर रामनाथ काथे,विष्णू पांडुरंग जाधव,मिना शाम पवार,साधना मोहन काळे,वंदना संतोष काळे, सुनिल आण्णा गवळी,शिवाजी प्रकाश परदेशी,उषा प्रभाकर काळे,नाज फकिर मोहंमद शेख,अनिल मच्छिद्र पवार,संजय जनार्दन नरवडे यांच्यावर गुन्हे दाखल केले.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री.अनिल कातकाडे उविपोअ, नगर शहर विभाग, अहमदनगर,श्री.संदीप मिटके उविपोअ,शिर्डी विभाग,शिर्डी व डॉ.श्री. बसवराज शिवपुजे उविपोअ, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,सफौ/बाळासाहेब मुळीक,पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे,मनोहर गोसावी,पोना/भिमराज खर्से,गणेश भिंगारदे,संतोष लोढे,पोकॉ/रविंद्र घुंगासे,आकाश काळे,बाळासाहेब गुंजाळ,रणजीत जाधव, मपोना/भाग्यश्री भिटे,मपोकॉ/ज्योती शिंदे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली आहे.