पाईपलाईनरोड येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश ठुबे यांचे थोरले बंधू अशोक ठुबे यांचे दुःखद निधन
अहमदनगर (दि.२७ सप्टेंबर):-पाईपलाईन रोड तागड वस्ती येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते योगेश ठुबे यांचे थोरले बंधू अशोक पाराजी ठुबे यांचे मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री १०. वा.च्या सुमारास दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी बुधवार,दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता अमरधाम,नालेगाव,अहमदनगर येथे होईल.स्व.अशोक ठुबे हे अत्यंत मनमिळावू,हसतमुख व कोणाच्याही मदतीसाठी सदैव धावणारे असे होते. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाश्चात आई,पत्नी दोन मुली,भाऊ,पुतणे,दोन बहिणी,दाजी,भाचे, इत्यादी होत.