Maharashtra247

चंदनापुरी घाटात अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी एकास अटक;डीवायएसपी व संगमनेर तालुका पोलीसांच्या पथकाने आरोपीस केले जेरबंद

 

 

संगमनेर/दत्तात्रय घोलप:-संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे खून केल्या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.

याबाबत आरोपीने तशी गुन्ह्याची कबुली दिली आहे. बातमीची हकीकत अशी की, संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटामध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत त्वरित तपास केला हा मृतदेह संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीचा असल्याचे तपासात समोर आले होते.

संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालून कसून चौकशील सुरुवात केली होती.डीवायएसपी यांचे पथक व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांनी या खून प्रकरणाचा सखोल तपास केला.सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासण्यात आले.या अल्पवयीन मुलीचा तुषार विठ्ठल वाळुंज (रा.लक्ष्मीनगर. संगमनेर) याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कबुली दिली.या आरोपीने सदर मुलीस मंगळवार दि.19 सप्टेंबर रोजी चंदनापुरी घाटात नेले होते.आरोपीने शहरामधून दारू खरेदी केली होती.

आरोपीची व या मुलीची जुनी ओळख असल्याने त्याने चंदनापुरी घाटात गेल्यानंतर सदर मुलीस दारू पाजली. दोघेही दारू पिल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.यानंतर दोघांमध्ये भांडण झाले.संतापाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार केले.पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रयत्न केले.मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

You cannot copy content of this page