आश्वी खुर्द येथील तरुण ग्रामपंचायत सदस्याचे अपघाती निधन
संगमनेर/राजेंद्र मेढे:-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचे सोमवारी रात्री अपघाती निधन झाले.
हा तरुण राहाता येथील बंधन बँकेत नोकरी करत होता.सोमवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता.जोरदार पाऊस असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाने निर्मळ पिप्री-लोणी रस्त्यावर निशिकांतच्या दुचाकीला हुलकावणी दिली. झालेल्या अपघातात बर्डे याच्या डोक्याला दुखापत झाली होती.परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर आश्वी खुर्द येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, एक भाऊ, भावजय, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.