Maharashtra247

बेलापुरातील प्राथमिक शाळेत खेळणी वाटप करुन मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.२७ सप्टेंबर):-गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त बेलापुर बु.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळणी वाटप करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक,मुस्ताक शेख, शफीक बागवान,विद्यार्थी कांग्रेस प्रदेश सचिव अक्षय पाटील नाईक,यांनी आपले मनोगत वक्त केले.तसेच गौसे आजम सेवा भावी संस्थाचे संस्थापक आली सय्यद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गौसे आजम सेवा भावी संस्था ही बेलापुरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काम करते ही संस्था महापुरुषांच्या जयंतीनिमित्त नवनविन उपक्रम कायम घेत असते. आज ही हज़रत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. खेळणी वाटप करण्याचे प्रमुख कारण म्हणजे आज लहान लहान शालेय मुले मोबाइल,लैपटॉप,व्हिडिओ गेम असे उपकरणाचा मोठ्या प्रमाणत वापर करत आहेत त्यामुळे त्यांच्या बुद्धिचा विकास होता आहेत परंतू शारीरिक विकास कमी होत आहेत लहान लहान मुले मोबाइल यांचा वापर करत असल्याने त्याचे लक्ष मैदानी खेळाकडे फारच कमी होताना दिसून येत आहेत.

यामुळे म्हणुन शाळेत खेळ खेळून शारीरिक व्यायाम होण्यास मदत होईल या उद्देश्याने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे आली सय्यद यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे शालेय पालक समितिचे अध्यक्ष राजू सय्यद,गौसे आजम सेवा भावी संस्थाचे अध्यक्ष सुल्तान शेख,सचिव नौशाद शेख,सदस्य आरिफ शेख,तसेच मुलींच्या शाळेचे पालक समित अध्यक्ष अजीज शेख,सामाजिक कार्यकर्ते शफीक आत्तार,मोहसिन सय्यद रेहान शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page