पिकअप गाडी व भंगार चोरी करणारी पाच आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद,सात लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर (दि.३० सप्टेंबर):-संगमनेर व राहुरी तालुका परिसरातुन पिकअप व भंगार चोरी करणाऱ्या पाच आरोपीना 7,90,000/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना अहमदनगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन,मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.पथक दि.30 सप्टेंबर रोजी नगर मनमाड रोडने श्रीरामपूरकडे जात असताना राहुरी फॅक्ट्ररी येथुन एक पिकअप वाहन भरधाव वेगाने राहुरीच्या दिशेने जाताना दिसली. पथकास सदर पिकअपचा संशय आल्याने त्यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर साहेब यांना संशयीत वाहना बाबत कळविले.
पोनि/श्री.आहेर यांनी तात्काळ पिकअपचा पाठलाग करुन संशयीतांकडे चौकशी करणे बाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे पथकाने संशयीत वाहनाचा पाठलाग करुन थांबविले असता केबिनमध्ये तीन व पाठीमागील ट्रॉलीचे हौदात दोन इसम बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)जैद मुश्ताक सय्यद 2) उमर बशीर शेख दोन्ही रा.देवळाली प्रवरा,ता. राहुरी, 3) मुजम्मिल मन्सुर शेख रा.बेलापुर, ता. श्रीरामपूर, 4) नजीर रज्जाक सय्यद रा.तनपुरेवाडी,ता. राहुरी व 5) सोहेल इब्राहिम पठाण रा.नांदुर रोड, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले.त्यांचेकडे नमुद पिकअप वाहनाचे कागदपत्र व त्यामधील भंगार सामान याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले.त्यांना विश्वासात घेवुन अधिक सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदर पिकअप संगमनेर येथुन चोरुन आणला असुन, वाहनातील भंगार सामान हे युनूस स्क्रॅप सेंटर,देवळाली प्रवरा,ता.राहुरी येथुन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कब्जातुन राहुरी येथुन चोरी केलेले 6,40,000/- रुपये किंमतीचे 1,600 किलो वजनाचे पिवळे धातुचे भंगार सामान व संगमनेर येथुन चोरी केलेली 1,50,000/- रुपये किंमतीची पिकअप असा एकुण 7,90,000/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व डॉ.श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/मनोहर गोसावी, अतुल लोटके,देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,फुरकान शेख,पोकॉ/रणजीत जाधव, जालिंदर माने,बाळासाहेब गुंजाळ,चापोहेकॉ/अर्जुन बडे व अरुण मोरे यांनी केलेली आहे.