एकाच कुटुंबातील दोघांचे दुर्दैवी निधन..नान्नज दुमाला परिसरात हळहळ.!!
संगमनेर ( दत्तात्रय घोलप ):-संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील भिकाजी खेमनर यांचे बंधू काशिनाथ खेमनर(वय -४५ वर्ष ) यांचे २८ सप्टेंबर २०२३ रोजी सोनोशी येथिल वटमादेवी पायथ्याजवळ नान्नज-मलादड रस्त्यालगत असणाऱ्या सोमनाथ गिते यांच्या खडी क्रेशरवर संशयास्पद मृत्यू झाला.
काशिनाथ खेमनर हे या खडी क्रेशरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते.तर ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळीच भिकाजी खेमनर यांच्या पत्नी सारिका भिकाजी खेमनर (वय-अंदाजे-३५ वर्ष )यांचेही उपचाादरम्यान एसएमबीटी हॉस्पिटल घोटी याठिकाणी उपचार सूरू असताना दुर्दैवी निधन झाले.काशीनाथ व सारिका यांच्या आचानक जाण्याने खेमनर परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे निधन होणारी हि घटना अतिशय दुर्दैवी आहे.
झालेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर घटनेमुळे खेमनर परिवारावर दुखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.शोकाकुल वातावरणात दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी नान्नज दुमाला ग्रामस्थांसह नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.