Maharashtra247

नगर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

 

अहमदनगर (दि.११ऑक्टोबर):-अहमदनर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास एक गावठी कट्टा व 01 जिवंत काडतुसासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला पोलीस यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थागुशा यांना आगामी नवरात्र उत्सवाचे अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे अनिकेत राजेंद्र वडागळे (रा.पाईपलाईन रोड, अहमदनगर) हा त्याचे कब्जामध्ये विनापरवाना गावठी कट्टा व काडतुस बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने तारकपुर ते रामवाडी जाणारे रोडने फिरत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर इसमाची माहिती काढुन त्यास ताब्यात घेणेबाबत सुचना देवुन रवाना केले.

पोलीस पथकाने तारकपुर ते रामवाडी रोडला सापळा लावुन त्या ठिकाणी एक संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत राजेंद्र वडागळे (रा. पाईपलाईन रोड,अहमदनगर, जि.अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.सदर इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 30,000/- रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व 500/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस,तसेच 50,000/- रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक ऍ़क्सेस मोटारसायकल असा एकुण 80,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. त्याचे कडे गावठी कट्टयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा कट्टा विक्री करण्याकरीता आणला असल्याची कबुली दिली.वरीलप्रमाणे 01 गावठी कट्टा, 01 जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द पोना/185 ज्ञानेश्वर नामदेव शिंदे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर तोफखाना पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 1485/2023 आर्म ऍ़क्ट 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोस्टे करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग,यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोहेकॉ/विजय वेठेकर, पोना/रविंद्र कर्डिले,संतोष लोढे,ज्ञानेश्वर शिंदे,संदीप चव्हाण यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page