एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात
अहमदनगर (दि.११ ऑक्टोबर):- ▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- 31 वर्ष,रा, वडगाव गुप्ता ता.जि.अहमदनगर
▶️ *आरोपी*
१) आलोसे नंदलाल मुरलीधर खैरे,पोलिस हवालदार/301, नेमणूक, एम आय डी सी पोलिस स्टेशन, जि. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* 30,000/-₹ *तडजोडी अंती* 10,000/-₹
▶️ *लाचेची मागणी दिनांक-* ता.26/07/2023
▶️ *लाचेचे कारण* – तक्रारदार यांचे कुटुंबिय व त्यांचे शेजारी राहणारे यांच्या मध्ये कचरा गोळा करून पेटवून देण्याच्या कारणावरून दि.10/07/2023 रोजी वाद झाला होता.सदर वादात तक्रारदार यांची भावजयी किरकोळ जखमी झाली होती म्हणून तक्रारदार यांनी एमआयडीसी पोस्टेला गुन्हा नोंदविला होता.
त्या अनुषंगाने आलोसे हे तक्रारदार यांचे घरी पंचनामा करणे करिता गेले होते. त्यावेळी आलोसे यांनी तक्रारदार यांचे शेजारी हे तक्रारदार व त्यांचे भाऊ यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देणार असल्या बाबत सांगितले होते व विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवुन घेण्याच्या मोबदल्यात 30,000/-रुपयाची लाच मागणी करत असल्या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे नोंदवली होती.
त्यानुसार दि. 26/07/2023 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली सदर लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे खैरे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे 30,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दि.11/10/2023 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:-
राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-: 9420896263
▶️ *सहाय्यक सापळा अधिकारी** शरद गोर्डे,पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-: 7719044322
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर मो. नंबर :- 8007679900,
▶️ *सापळा पथक** -पोलीस हवालदार संतोष शिंदे,पोलिस नाईक विजय गंगुल, रमेश चौधरी, पोलीस अंमलदार वैभव पांढरे,बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे,सचिन सुद्रुक, चालक पोहेकाँ हारून शेख, दशरथ लाड,
▶️ **मार्गदर्शक* -*मा.शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, मो. नंबर- 9371957391,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶️मा. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, मो. नंबर-
9404333049 ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र,नाशिक.
▶️ श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, मो. नंबर 9822627288,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ **आरोपीचे सक्षम अधिकारी -* मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर.