निर्भय बनो आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अजून दोन जण आरोपी घेतले ताब्यात;पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत केली कारवाई
अहमदनगर (दि.११ ऑक्टो):-ज्येष्ठ लेखक तसेच निर्भय बनो आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीं पैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी पकडले होते.
दाखल गुन्हयात फरार असलेले असलेले आरोपी नामे 1)सनि ज्ञानेश्वर जगधने रा.रंगभवन सर्जेपुरा व 2)अक्षय कैलास माळी रा.सर्जेपुरा यांना तोफखाना पोलीसांनी सापळा लाऊन जेरबंद केले.आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि.13 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखालील तोफखाना पो.नि.श्री.मधुकर साळवे,पो.उपनिरी/सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/ सुनिल शिरसाट,पोना/संदिप धामणे,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसीम पठाण, पोना/अहमद इनामदार,पोना/ सुरज वाबळे,पोकॉ/सचिन जगताप,/पोकॉ/शिरीष तरटे, पोकाॅ/सतीश भवर,पोकॉ/ सतिष त्रिभुवन,पोकॉ/संदिप गि-हे,पोकॉ/बाळासाहेब भापसे,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/गौतम सातपुते,पोकॉ/सतिष खोमणे यांनी केली असुन तांत्रिक मदत सायबरचे पोकाॅ/राहुल गुंडू यांनी केली आहे.पुढील तपास मपोसई/शुभांगी मोरे या करत आहेत.