
अहमदनगर (दि.१३ ऑक्टोबर):-भारतीय शिक्षा मंत्रालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE ) यांच्या विद्यमाने देण्यात येणारा २०२३ चा INNOVATIVE PRINCIPAL NATIONAL AWARD OF THE DECADE या राष्ट्रीय पुरस्कार नामांकन श्री.साई इंग्लिश ग्रूप ऑफ स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे एज्युकेशनल डायरेक्टर डॉ.अर्जुन राठोड यांना घोषित करण्यात आला.२०१३ ते २०२३ या दशकातील सर्वोत्तम प्राचार्य या पुरस्कारासाठी २०२२ या वर्षी निवड प्रस्ताव शिक्षण मंडळा कडून मागविण्यात आले होते.त्या प्रस्ताव मधून ७५० प्रस्ताव प्राथमिक स्वरूपात स्वीकारून या ७५० प्रस्तावातून १० सर्वोत्तम प्राचार्य यांची निवड करण्यात आली.केंद्रीय निवड समितीने या दशकातील सर्वोत्तम प्राचार्य म्हणून डॉ.अर्जुन राठोड यांची ४ थ्या क्रमांकाची पसंती देत PRINCIPAL NATIONAL AWARD OF THE DECADE या राष्ट्रीय पुरस्काराच्या नामांकना त्यांची निवड करण्यात आली.
ते महाराष्ट्रातील २०२३ या वर्षी चे एकमेव राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राचार्य आहेत.या अगोदर 2019 सालाचा सर्वोत्तम तरुण प्राचार्य ( THE BEST YOUNGE PRINCPAL OF THE YEAR ) राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
2010 पासून केंद्रीय शिक्षा मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सी बी एस ई शाळेत त्यांनी मागील 15 वर्षापासून ज्ञान दानाचे कार्य अविरतपणे करत आहेत,त्यात त्यांनी प्राचार्य म्हणून शालेय व्यवस्थापन आणि नियोजन उत्तमरित्या पार पाडत आहेत,ते मागील 10 वर्षापासून केंद्रीय शिक्षा मंत्रालय अंतर्गत सी बी एस ई आणि स्टेट बोर्ड अशा शाळांसाठी भाषा आणि अभ्यासक्रम संरचना,विषय तज्ञ आणि प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्त आहेत.तसेच शिक्षणाचा नवीन कायदा 2020 केंद्रीय समितीसाठी नवनियुक्त सदस्य म्हणून (न्यू एज्युकेशन पॉलिसी ) आपली सेवा देत आहेत.सी बी एस ई प्रशिक्षित प्रशिक्षक ( CBSE Trained Trainer) म्हणून मागील 12 वर्षापासून सी बी एस ई मध्ये कार्यरत आहेत.
देशभरातील 750 प्राचार्य प्रस्तावातून सर्वोत्तम 10 प्राचार्या मध्ये केंद्रित निवड समिती ने 4 थ्या क्रमांकाची पसंती देत त्यांना PRINCIPAL NATIONAL AWARD OF THE DECADE या राष्ट्रीय पुरस्काराचे नामांकन दि. 6 ऑक्टोबर 2023,शुक्रवारच्या पूर्व संध्येला जाहीर करण्यात आले.एज्युकेशनल डायरेक्टर डॉ.अर्जुन राठोड यांचे महर्षी प्रतिष्ठान संचलित श्री.साई इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक नाथा कानडे यांनी सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या,तसेच शालेय स्तरातून प्राचार्या श्रीमती तनुजा लोंढे,पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रमुख श्रीमती.मीना गायकवाड,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थांनी निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या. एज्युकेशनल डायरेक्टर डॉ.अर्जुन राठोड यांचे निवड झाल्या बद्दल पालक आणि सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. ते अहमदनगर ,आणि महाराष्ट्रातून एकमेव असे राष्ट्रीय पुरस्कारा साठी पात्र असे उमेदवार ठरले आहेत.