लहुजी शक्तीसेना अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करण्यात यावे या मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह धडकणार लहुजी शक्ती सेना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नागपूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
प्रतिनिधी (दि.21.डिसेंबर):-अनुसुचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी लहुजी शक्तीसेना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोठ्या संख्येने धडकणार अशी माहिती लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्याक्ष कोअर कमिटी कैलास खंदारे यांनी महाराष्ट्र न्यूज बोलताना दिली.यावेळी ते पुढे असे म्हणाले की या भारत देशामध्ये सर्व सामान्य करिता भारतीय राज्यघटना ग्रंथ समजला जातो तसेच या भारत देशामध्ये अनेक नागरिकांना सामाजिक आर्थिक शैक्षाणिक राजनैतिक न्याय देण्याचे व नैसर्गिक न्यायापासून अनेक वर्षापासून वंचित व उपेक्षित राहिलेल्या घटकांना (जातीना )सामाजिक न्याय देवून समता निर्माण करण्याचे आश्वासन घटनेने दिले आहे. राज्यघटनेने दिलेली अधिकार प्रत्यक्षात आणून सर्व अविकसित घटकांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी सरकारची आहे राज्यघटनेने अपेक्षित पीडित व शोषित घटकासाठी आरक्षणाची तरतूद केली असताना देखील या महाराष्ट्रातील राज्यांमध्ये अनुसूचित जाती गटातील जातींना ५९ जातींना १३ % टक्के एकत्रित आरक्षणाची तरतूद असताना मात्र आरक्षणाचा सर्वाधिक लाभ शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक दृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या सक्षम आक्रमक असलेल्या जातीच घेत आहेत तसेच अनुसूचित जाती गटातील जवळपास ५६ ते ५७ या जाती या आरक्षणाचा लाभापासून वंचित राहिलेले आहेत या जातीची लोकसंख्या ३० % टक्के ते ४० % टक्के असून ही शिक्षण व नोकरीमध्ये लाभ व शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत तसेच बिहार राज्य प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये अति शोषित (महा दलित) आयोग नेमणूक करून राज्य सरकारच्या अनुसूचित जाती करिता असलेल्या सर्व योजनांची अ ब क ड नुसार वर्गवारी करण्यात यावी तसेच क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाने २००८ साली ८२ ज्या शिफारस सादर केलेल्या अहवालातील ३१ डिसेंबर २०११ रोजी शासनाने शासनाने ६८ शिफारशीची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अनुसूचित जाती या गटाकरिता एकत्रित असलेल्या १३ टक्के आरक्षणाची अ ब क ड वर्गवारी करण्याचा ठराव विधिमंडळात संमत करून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा अशा या विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली व कैलास खंदारे प्रदेशाध्यक्ष कोअर कमिटी,सचिन क्षिरसागर प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी,हेमंत खंदारे प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी,महादेव भोसले ( महाराज ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,सौ.सरिता पोटफाडे महिला अध्यक्ष,यांच्या समवेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर महाआंदोलनची सुरुवात वर्धा सेवाग्राम येथून ते नागपूर पर्यंत पदयात्रेने सुरुवात होणार आहे.ही पदयात्रा दि.२६ डिसेंबर पासून सुरु होईल व दि. २९ डिसेंबर रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडियम मध्ये एक दिवशीय लाकक्षनिक उपोषण करण्यात येईल या उपोषणादरम्यान अखंड महाराष्ट्रातील मातंग समाजातील महिला व पुरुष तसेच लहुजी शक्तीसेनेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व जिल्हाअध्यक्ष शाखाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या महाआंदोलनात सहभागी होणार आहेत तरी सर्वानी आपल्या मातंग समाजाच्या हक्काच्या मागण्या करिता या महाआंदोलनात सामील व्हावे असे आव्हान लहुजी शक्तीसेनेचे प्रदेशाध्यक्ष कोअर कमिटी कैलास खंदारे यांनी केले आहे.