Your message has been sent
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१. डिसेंबर):-नगर शहरातील पाईपलाईनरोड येथील प्रसिद्ध असलेला तसेच शरीरास हानिकारक असलेल्या मयूर मावा सेंटरवर तोफखाना पोलिसांनी आज दि.२१ डिसेंबर रोजी छापा टाकला आहे.छाप्या दरम्यान तयार मावा तसेच मावा बनवण्यासाठी असलेले यंत्र,तंबाखूजन्य पदार्थ,सुपारी याठिकानावरून जप्त केले आहे.या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.तोफखाना पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक आठरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.