नवदुर्गा पुरस्कारामुळे कार्यकर्तृत्वान महिलांच्या जीवनात आनंद-मा.नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे.!!
संगमनेर (दत्तात्रय घोलप/राजेंद्र मेढे):-संगमनेर तालक्यातील तळेगाव दिघे येथिल निसर्गा बहुउद्देशी सामाजिक सेवाभावी संस्था व जनसंवाद चॅनल महा.राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक वैद्यकीय,आरोग्य,क्षेत्रातील कार्य कर्तुत्वावान महिलांचा संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या शुभहस्ते तसेच लोटस इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका डॉ.नीलिमा निघुते यांच्या आध्यक्षतेखाली “राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार गौरव सोहळा तळेगाव दिघे येथे गुरूवार दि.१९ ऑक्टबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात पार पडला.
निसर्गा बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजश्री व डॉ.भरत दशरथ दिघे व जनसंवाद चॅनलचे संपादक दत्तात्रय घोलप यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी डॉ.दिपाली पानसरे,सुनीता कोडे,डॉ.श्रद्धा वाणी,माधुरी शेवाळे,स्न्हेलता कडलग,वकील सिमा काळे,आदी मान्यवर महिलाप्रमुख पाहुणे म्हणुन विचार मंचावर विराजमान उपस्थित होते.
नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यात योगिता आदित्य घाटगे,राजश्री बाबासाहेब कांदळकर,डॉ.स्वाती संतोष डांगे,कविता सुनील दिघे,आशा सचिन दिघे,वंदना आहेर,मनिषा उकिर्डे, ज्योती काहंडळ,शैला बोऱ्हाडे,संगीता बर्डे,डॉ.मीनाक्षी जोंधळे,संध्या गोर्डे,सोनाली धात्रक,जिजाताई मते,स्वाती भागवत,प्रणाली जोर्वेकर,वैष्णवी दिघे,शालू दिघे,रंजना दिघे,योगिता दिघे,अरुणा दिघे,मिना यादव मोनाली दिघे यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी मान्यवर महिला,पुरस्कारार्थी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंवाद चॅनलचे संपादक दत्तात्रय घोलप यांनी केले तर प्रस्ताविक राजश्री दिघे यांनी मानले तर आभार प्रदर्शन डॉ.भरत दिघे यांनी केले.सर्वच नवदुर्गा पुरस्कारार्थीच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.