सामाजिक कार्यकर्त्या मायाताई अर्जुन माने यांची भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती
प्रतिनिधी (दि.२० ऑक्टोबर):-सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच भटके विमुक्त महिला मोर्चाच्या मा.जिल्हाध्यक्षा मायाताई अर्जुन माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली.
सौ.माने यांनी भारतीय नव जवान सेना पक्ष,वडार समाज महिला,सैनिक फेडरेशन तसेच लोकाधिकार सामाजिक संस्था जिल्हाध्यक्ष इत्यादी पद भूषविले आहे.भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत विविध सामाजिक घटकांचा विकास व्हावा या उद्देशाने अनेक आघाड्यांचे माध्यमातून विकास कार्य सुरू आहे.त्यापैकी एक म्हणजे ओबीसी मोर्चा कार्यरत आहे.
भारतीय जनता पक्षासाठी अनेक मोर्चे,आंदोलने तसेच पक्ष वाढीसाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी सौ.माया माने यांनी सोलापूर जिल्हा पिंजून काढला आहे.गोरगरिबांना अन्याय अत्याचार झालेल्यांना कायम मदतीचा हात त्या देत असतात या कामाची पावती म्हणून त्यांची निवड झाली. सौ.माया माने यांना पक्षाच्या वतीने नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.माने यांच्या रूपाने सोलापुर जिल्हात सामाजिक कार्य करणारी आपल्या हक्काची ताई यांना पद भेटल्याने परिसरात तसेच जिल्ह्यात एक आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.