हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची विविध क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (दि.२० ऑक्टोबर):-वडगाव गुप्ता येथील नामांकित त्रावण कोर एज्युकेशन ट्रस्ट संचलित हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांनी सध्या चालू असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धामध्ये विविध क्रीडा प्रकारात विविध स्तरावर यश संपादन केले.
यामध्ये सतरा वर्षाखालील मुली या गटात आर्या विशाल चोरगे तर 14 वर्षाखालील मुले या गटात देवदत्त विशाल चोरगे यांनी मल्लखांब व रोप मल्लखांब या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.तसेच कादंबरी भरत दहिभाते हिने एयर पिस्तूल शूटिंग या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच सिद्धि विनायक थोरात हिने थाळीफेक या क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच याआधी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आर्या चोरगे हिने सतरा वर्षाखालील मुली या गटामध्ये 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम तर सिद्धी थोरात हिने 14 वर्षाखालील मुली या गटांमध्ये थाळीफेक व लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. या सर्व विद्यार्थ्यांची पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल ठोंबे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य अशोक बेरड यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले.