
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी होत असतानाच आता संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत असून मराठा लढ्याच्या आरक्षणास पाठिंबा दर्शविला जात आहे.
एक मराठा,कोटी मराठा,लाख मराठा तसेच आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणा देत मराठा बांधवानी आज निमोण-तळेगाव गटातील पारेगाव बुद्रुक गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजपासून सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पासून ते जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना आता गाव बंदी केली आहे.
गावच्या वेशीवर सकल मराठा बांधवांकडून पुढाऱ्यांना प्रवेश बंदी असणाऱ्या फ्लेक्स बोर्ड लावण्यात आला आहे.अंतरवली सराटी येथे सुरू जरांगे पाटील यांचे सुरु असलेल्या मराठा आमरण आरक्षणास सकल मराठा बांधव व पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.मराठा समाज व अरक्षणा विरुद्ध गरळ ओकणारे वकील गुणरत्न सदावर्ते, नारायण राणे,छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध सकल मराठा बांधवांकडून नोंदवण्यात आला आहे. पारेगाव बुद्रुक येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे.यावेळी पारेगाव बुद्रुक येथील समाज बांधवांकडून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.