
अहमदनगर (दि.२९ ऑक्टोबर):-अहमदनगर महानगरपालिकेचे शिंदे गटाचे नगरसेवक मदन आढाव यांनी मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नाही. म्हणून आपल्या नगरसेवक पदाचा महानगरपालिका आयुक्तांकडे लेटरपॅड द्वारे राजीनामा पाठवला आहे.या पत्रामध्ये नगरसेवक मदन आढाव यांनी म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण सरकार देत नाही तसेच मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती खूप खालवलेली आहे मराठा समाजाच्या तरुण मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.
आता अशा या राजकारणाचा वीट आला आहे सर्व राजकीय पुढार्यांनी मराठा समाजाला वेड्यात काढले आहे त्यामुळे आता नेते गेले चुलीत यापुढे आता फक्त मराठा समाजाला आरक्षण एवढेच ध्येय आहे म्हणून नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे.
