Maharashtra247

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून मराठा आरक्षण मागणीस नगर शहर मराठा डॉक्टर संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा

अहमदनगर (दि.३१ ऑक्टोबर):-मराठा आरक्षण संघर्ष योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून मराठा आरक्षण या मागणीस नगर शहर मराठा डॉक्टर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि.३१ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहर मराठा डॉक्टर संघटना आपणास महाराष्ट्र शासन यांना निवेदन देत आहे की अंतरवाली सराट जिल्हा जालना येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून जे प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे त्यास आम्ही नगर शहर मराठा डॉक्टर संघटना पाठिंबा देत आहोत तरी आपण महाराष्ट्र शासनास आमची मागणी कळवावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी डॉ.सचिन पांडुळे,डॉ.अविनाश मोरे,डॉ, मंगेश काळे,डॉ,अरविंद गायकवाड,डॉ.बाबासाहेब शेवाळे,डॉ.रोहित करांडे,डॉ. संदीप अनभुले,डॉ.महेश डोके,डॉ.चंद्रकांत केवळ,डॉ. विजय कवळे,डॉ.दिलीप पवार,डॉ.सुनील बोठे,डॉ.मधुकर गव्हाणे,डॉ.मंगेश जाधव,डॉ.अमित पवार झुंजारराव झांजे इ.उपस्थित होते.

You cannot copy content of this page