Maharashtra247

लोणी-नांदूर शिंगोटे महामार्गवर नान्नज दुमालातील मराठ्यांचे चक्काजाम आंदोलन.!!

संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालूक्यातील नान्नज दुमाला येथे मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा बांधवांच्या वतीने नान्नज दुमाला गावात आज मंगळावर दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्व व्यवसायिकांनी १००%बंद पाळून सामूहिकरित्या जरांगे पाटील यांचे अंतरवली सराट येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे.

यावेळी समस्त सकल मराठा बांधवांच्या वतीने गावातून रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी संतप्त झालेल्या मराठा बांधवांच्या वतीने नान्नज दुमाला गावाजवळून जाणारा लोणी-नांदूर शिंगोटे राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा बांधवांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.शांतेतेच्या मार्गाने साधारणपणें वीस मिनिटे महामार्ग आडवून आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.मराठ्यांना सरसकट आरक्षण जाहीर करावे अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.सकल मराठा बांधवांच्या वतीने महामार्गावर थांबलेली ट्रॉफीक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.यावेळी सकल मराठा बांधवांच्या वतीने पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी असणारे फ्लेक्स बोर्ड लोणी नांदूर-शिंगोटे महामार्गलगत तसेच गावातील मुख्य दर्शनी भागात लावले आहेत.यावेळी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भिमराज चत्तर,दिनकर चत्तर,शंकर चत्तर, समाधान चत्तार यांनी आपल्या भावना बोलताना व्यक्त केल्या आहेत.

You cannot copy content of this page