Maharashtra247

तळेगाव वडगावपान गटातील २१ गावे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर १००% कडकडीत बंद.!!

संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालूक्यातील तळेगाव वडगाव पान गटातील २१ गावे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा बांधवांच्या हाकेला प्रतिसाद देत आज व्यवसायिकांनी १००%बंद पाळून सामूहिकरित्या जरांगे पाटील यांचे अंतरवली सराट येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे.

सरकारने मराठा बांधवांचा अंत पाहू नये लवकरात लवकर सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे अशी मागणी सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे. याप्रसंगी शेतकी संघाचे संचालक सचिनभाऊ दिघे, तळेगाव ग्रामपंचायत ची माजी उपसरपंच रमेशभाऊ दिघे,नजीरभाई शेख यांसह अनेक आंदोलनकर्त्या बांधवानी आपल्या भावना व्यक्त केले आहेत. यावेळी सकल मराठा बांधवांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

You cannot copy content of this page