
अहमदनगर (दि.३१ ऑक्टोबर):-अहमदनगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरट्यांनी धुमाकुळ घातला होता.मोटार सायकल चोरी करणारे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत जिल्हा पोलिसी अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमुन जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवून गुन्हे उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.पथक नगर शहर परिसरात फिरुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असताना दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे सर्जेराव मकासरे रा. वांबोरी,ता.राहुरी हा चोरीची विना नंबर सी.डी.डिलक्स मोटार सायकल घेवुन शेंडी बायपास येथे विक्री करणे करीता येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन,पंचाना सोबत घेवुन,खात्री करून कारवाई करणे बाबत कळविले.पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबलेले असताना एक संशयीत इसम विना नंबर मोटार सायकलवर येताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले.संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) सर्जेराव सुंदर मकासरे रा.वांबोरी,ता.राहुरी हल्ली रा.मुकींदपुर,ता.नेवासा असे असल्याचे सांगितले.
त्यास ताब्यातील मोटार सायकल व त्याचे कागदपत्रा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने अहमदनगर शहरामधुन सदर मोटार सायकल चोरी केली असुन विक्री करणे करीता आणली असल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहुन चोरी केलेल्या मोटार सायकल पैकी काही मोटार सायकल या मुकदपुर,ता.नेवासा येथील त्याचे घरामागे व दोन मोटार सायकल या इसम नामे भिष्माचार्य शाहु कांबळे रा. उंबरे,ता.राहुरी हल्ली रा. एमआयडीसी,अहमदनगर याचेकडे विक्री करीता दिल्या असल्याचे सांगितले.पथकाने लागलीच मुकिंदपुर,ता. नेवासा येथील घरी जावुन घराचे पाठीमागील बाजूस आलेल्या शेडमध्ये जावुन पाहणी केली असता शेडमध्ये झाकून ठेवलेल्या विविध कंपनीच्या ९ मोटारसायकल व १ चेसी मिळुन आली.
व आरोपी नामे भिष्माचार्य कांबळे याचा एमआयडीसी अहमदनगर परिसरात शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास चोरीच्या २ दोन मोटार सायकलसह ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ८ लाख ४२,००० रू.किमतीच्या विविध कंपनीच्या १२ मोटार सायकल व १ चेसिच मिळून आली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/ बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, सचिन आडबल,संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे,संदीप चव्हाण, संतोष खैरे,पोकॉ/सागर ससाणे,रोहित येमुल,आकाश काळे,रणजीत जाधव व चापोकॉ/अरुण मोरे यांनी केली आहे.