ग्रामपंचायत निवडणुकीचा तहसील कार्यालयात उद्या मतमोजणी निकाल वाहतुकीत बदल जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आदेश
अहमदनगर (दि.५ नोव्हेंबर):-नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी शांततेत मतदान पार पडले.नगर तहसील कार्यालयात दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणीचा निकाल ऐकण्याकरीता अनेक नागरिक आपआपली वाहने तहसील कार्यालय येथे घेऊन येण्याची शक्यता आहे.
येथे फक्त तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वाहने बसतील इतकीच पार्किंगची सुविधा असल्यामुळे इतर लोकांचे वाहने तिथे आल्याने गर्दी होऊन वाहतुकीस कोंडी निर्माण होऊ शकते त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाहतुकीत बदल केला असून एक स्वतंत्र असा आदेश काढला आहे.
वाहतुकीचा मार्ग