Maharashtra247

ब्रेकिंग ..अहमदनगर मतदान केंद्राबाहेर मतदाराचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर (दि.५ नोव्हेंबर):-आज दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हाभरात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे.एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असतांना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानास वेग येत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात करंजीमध्ये मतदानानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.सुनील गांधी असे मयत मतदाराचे नाव आहे.नगर जिल्ह्यातील करंजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर मतदान करायाला आलेले मतदार सुनील गांधी यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.

You cannot copy content of this page