
येवला प्रतिनिधी (दि.६ नोव्हेंबर):-नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युवानेतृत्व प्रथमेश राजेंद्र पगारे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
तसे पत्र भारतीय जनता पार्टीचे येवला तालुका अध्यक्ष नानासाहेब लहरे पाटील यांनी दिले आहे. आपल्या गावातच नव्हे तर संपूर्ण येवला तालुक्यात आपल्या समजकार्याने नागरिकांमध्ये ठसा उमठवणारे प्रथमेश पगारे हे भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ सदस्य आहेत.तसेच गोरगरिबांना मदत करणे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे त्यावर पर्याय काढून नागरिकांना मदत करणे समाजसेवा या कामाची पावती म्हणून पगारे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली आहे.