पोलिसांच्या वाहनाला वाळूच्या डंपरची धडक
शेवगाव प्रतिनिधी (दि.२३. डिसेंबर):-पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील लाडजळगाव परिसरात गस्त घालत असतांना रस्त्यावर उभे असलेले पोलीसांचे खाजगी वाहन वाळु तस्करी करणार्या डंपरने जोराची थडक देवून उडवल्याचा प्रकार दि.22 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.या वाहनाजवळ उभ्या असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी बाजुला झाल्याने वाचले.या प्रकरणी डंपर चालक व इतरांवर जीवे मारण्याच्या कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले आह.सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल हे अधिक तपास करीत आहेत.