
अहमदनगर (दि.९ नोव्हेंबर):-संगमनेर शहरातील जेलचे गज कापून बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची घटना दि ८ नोव्हेंबर रोजी घडली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणात संगमनेर शहरच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.या आरोपींच्या तपासासाठी चार ते पाच पथक नियुक्त केले होते.अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांना पकडण्यात आज यश आले आहे.पळून गेलेल्या आरोपींमध्ये रोशन दधेल उर्फ थापा नावाचा आरोपी नेपाळशी संबंधित असल्याने सर्व आरोपी त्याच दिशेने जाण्याची शक्यता होती.
त्यामुळे पोलिसांचे संपूर्ण नजर त्याच दिशेने फिरत असतांना आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या वाहनात जळगाव जिल्ह्यात बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच जिल्ह्यात असल्याने याबाबत त्यांना सूचना देण्यात आली.तेथून आरोपी थांबलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून निघाल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपास करत त्यांचा माग काढला आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर जवळ चौघांनाही ताब्यात घेतले.एकुण ६ आरोपीना जामनेर,जिल्हा जळगाव यथुन वाहनासह ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री.सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात,पोसई / सोपान गोरे, पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,फुरकान शेख,संतोष लोढे, विशाल दळवी,संदीप चव्हाण,पोकॉ/अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर,बाळासाहेब गुंजाळ,प्रशांत राठोड, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ/जायभाय यांचे पथकाने केली आहे.
