
अहमदनगर (दि.१९ नोव्हेंबर):-तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच शहरातील विविध ठिकाणावरून महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना तोफखाना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून तब्बल ६ लाख १५ हजारांच्या सात मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
करण मनोज पवार रा.कॉटेज कॉर्नर,उमेश दिलीप गायकवाड रा.नाना चौक,ढवणवस्ती, मनोज गोरख मांजरे रा.कल्याण रोड असे पकडलेल्या आरोपींचे नावे आहेत.त्यांचे कडे तपास केला असता त्यांनी अहमदनगर शहरातुन विविध ठिकाणाहुन या गाड्या चोरलेल्या आहेत अशी कबुली दिली.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखालील तोफखाना पोलिस निरीक्षक मधुकर साळवे,गुन्हे शोध पथकाचे पो.उपनिरी/सचिन रणशेवरे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट, पोना/दिनेश मोरे,पोना/संदिप धामणे,अविनाश वाकचौरे,पोना/वसीम पठाण, पोना/अहमद इनामदार,पोना/ सुरज वाबळे,पोना/भानुदास खेडकर,पोकॉ/सचिन जगताप पोकॉ/सतिष त्रिभुवन,पोकॉ/ सतीष भवर,पोकॉ/संदिप गि-हे,पोकॉ/शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,पोकॉ/सुमीत गवळी,गौतम सातपुते,तसेच तांत्रीक विश्लेषण पोकॉ/राहुल गुंडु यांनी केले असुन पुढील तपास पोना/संदिप धामणे करीत आहे.