
अहमदनगर (दि.२८ नोव्हेंबर):-अहमदनगर शहरातील मिरा मेडीकलची भिंत तोडुन आत प्रवेश करुन, काऊंटरमधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.

बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी मोहम्मद कमाल शेख (रा. डावरे हॉस्पीटल मागे, हातमपुरा,अहमदनगर) यांच्या मिरा मेडीकलच्या मागिल भिंतीस कशाने तरी 10 इंच छिंद्र पाडुन,प्लायडुर तोडुन आत प्रवेश करुन,अनोळखी चोरट्याने कॉऊंटर उघडुन काऊटंरमधील 35000/- रुपये रोख चोरी करुन नेली होती या बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1658/2023 भादविक 457,380 प्रमाणे द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा यांना पथक नेमुण गुन्ह्याचा समांतर तपास करुन,गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.
पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,वर नमुद गुन्हा हा इसम नामे गुलाब चव्हाण रा.सारसनगर, अहमदनगर याने केला असुन तो सारसनगर येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावुन बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीताचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) गुलाब ऊर्फ गुलाट्या श्रीखंड्या चव्हाण रा. चिपाडेमळा,सारसनगर, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यास अधिक विश्वासात घेवुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या रोख रकमे बाबत अधिक चौकशी करता त्याने 4,480/- रुपये रोख काढुन दिल्याने त्यास मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
हि कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री. अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,सफौ/ राजेंद्र वाघ,पोहेकॉ/संदीप पवार,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,विशाल दळवी, भिमराज खर्से,पोकॉ/रविंद्र घुंगासे,अमृत आढाव व प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.