संगमनेर (राजेंद्र मेढे):-शिर्डी ते आळंदी पायी जाणाऱ्या काशिकानंद महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यांना एका कंटेनर चालकाने उडवुन दिल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खंदरमाळवाडी शिवारात हॉटेल गोकुळवाडी येथे घडली.
यात चार वारकरी ठार झाले असून १५ ते २० जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.बाळासाहेब अर्जुन गवळी (रा.मढी,ता.कोपरगाव,जि.अ.नगर), चोपदार असलेले बबन पाटीलबा थोरे (रा.द्वारकानाथ शिर्डी.जि.अ. नगर),भाऊसाहेब नाथा जपे (कनकोली,ता.राहाता,जि.अ. नगर),आणि ताराबाई गंगाधर गमे (रा.कोहाळे,ता. राहाता) अशी मयत झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत.या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट हळहळ करीत आहे.