
नागपूर प्रतिनिधी:-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून,एका १४ वर्षीय मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या शितल धनविज यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यात यावी अशी मागणी केली आहे.