भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुभाष आल्हाट यांची नियुक्ती
अहमदनगर (दि.४ डिसेंबर):-फुले,शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुभाष आल्हाट यांची भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
बामसेफचे राष्ट्रीय महासचिव प्रा.डी.आर.ओहळ सर यांच्या हस्ते तसे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. आल्हाट यांच्या रूपाने पुन्हा एकदा जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाला नवसंजीवनी मिळून युवकांची मोठी फळी तयार होणार आहे.यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट म्हणाले की नगर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये तसेच शहरातही भारत मुक्ती मोर्चाच्या शाखा वाढविण्याचे प्रथमता काम करणार आहे.यामुळे संघटन वाढण्यास मदत होईल.आल्हाट यांच्या नियुक्तीने त्यांना परिसरातील नागरिक तसेच जिल्ह्यातूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.