
अहमदनगर (दि.४ डिसेंबर):-तब्बल १९ गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे पारनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/दिनेश आहेर यांना दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,फरार आरोपी नामे शरद कैलास काळे व विशाल कैलास काळे हे त्यांचे राहते घरी आल्याची माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास कळवुन आरोपींचे राहते घरी जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत कळविले.
पोलीस पथक आरोपीचे घरी जात असतांना आरोपींनी पोलीस पथकास पाहुन पळु लागले असता पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांची पुर्ण. नांव गांव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १) शरद कैलास काळे रा.कडुस,ता.पारनेर, जि.अहमदनगर व २) तुषार उर्फ विशाल कैलास काळे वय रा.सदर असे असल्याचे सांगितले. सदर ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६७ / २०२३ भादवि कलम ३८०, ३४२,३४ चे तपासकामी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोना/रविंद्र कर्डीले,संदीप दरंदले, भिमराज खर्से,संतोष खैरे, पोकॉ/अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे,सागर ससाणे,रोहित येमुल,शिवाजी ढाकणे,मेघराज कोल्हे,चालक पोकॉ/अरुण मोरे यांनी केली आहे.