Maharashtra247

शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण करून अवैध धंदे करणाऱ्यांना कोतवाली पोलिसांचा ‘दणका’

अहमदनगर (दि.११ डिसेंबर):-कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे करू पाहणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे शाळा महाविद्यालयाने मोकळा श्वास घेतला आहे.शाळा-महाविद्यालयाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष लक्ष घालत हजारो विद्यार्थ्यांची अनेक शिबीरे घेतली आहेत.या परिसरात अतिक्रमणे करून त्या ठिकाणी अवैधरीत्या मावा गुटखा विकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

गेल्या महिन्यात देखील कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने महानगरपालिकेला सोबत घेऊन अतिक्रमाणावर कारवाई केली होती.मात्र असे असताना पुन्हा अतिकिमणांनी डोके वर काढत त्या ठिकाणी अवैध प्रकार निदर्शनास आले होते. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाऊसाहेब फिरोदिया आणि इतर शाळा परिसरात काही इसमांनी अतिक्रमण करून हिरव्या नेटचे शेड तयार करून त्या ठिकाणी अवैध धंदे करण्यास सुरुवात केली होती. कोतवाली पोलिसांनी ही सगळी अतिक्रमणे काढून ऋषिकेश मोरे, राहणार आदर्श नगर कल्याण रोड, सीताराम गाडेकर, राहणार हिंगणगाव तालुका नगर यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करून रोख रक्कम व इतर साहित्य असा १०,२४० रू चा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हे दाखल केले आहेत.

शेड नेट व इतर साहित्य जागीच काढून नाश करण्यात आले. अतिक्रमण केल्याने शाळा महाविद्यालय परिसरात वाहतूकीला अडथळा निर्माण होतो तसेच अवैध वस्तूंची विक्री केल्याने याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. झालेल्या या कारवाईचेविद्यार्थी पालकांकडून स्वागत होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अमलदार तनवीर शेख,योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे,संदीप थोरात,अभय कदम,रिंकू काजळे,सलीम शेख,शाहिद शेख,सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page