Maharashtra247

हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथे रोलर ॲथलेटिक्स व एंडूरन्स जिल्हा निवड चाचणी स्केटिंग स्पर्धा संपन्न

अहमदनगर (दि.११ डिसेंबर):-हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथे रोलर ॲथलेटिक्स व एंडूरन्स जिल्हा निवड चाचणी स्केटिंग स्पर्धा रविवारी संपन्न झाल्या.

10 डिसेंबर २०२३ रोजी हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथे रोलर ॲथलेटिक्स व एंडूरन्स अशा दोन प्रकारचे स्केटिंग स्पर्धांची जिल्हा निवड चाचणी पार पडली, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आर.डी. इंजिनियरिंग वर्कचे संचालक तोसिफ पठाण, तसेच स्कूलचे प्राचार्य अशोक बेरड,रोलर ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, तसेच एंडूरन्स संघटनेचे अध्यक्ष संजयजी नन्नवरे,रोलर ॲथलेटिक्स व एंडूरन्स संघटनेचे सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे हे उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.यामध्ये ध्येय घुगरकर दोन रौप्य पदके, आदर्श मुथा दोन रौप्य व एक कांस्य पदक,जय चव्हाण दोन कांस्यपदके,ऋग्वेद लेंडे दोन सुवर्ण व एक कांस्यपदक, तनिष्क जिवे सुवर्ण रौप्य व कांस्य पदक,आयुष झावरे दोन रौप्य पदके,रिदा शेख तीन सुवर्णपदके,रुद्र शेडाळे व आर्यन काकडे तीन सुवर्णपदके, विराज आढाव दोन रौप्य पदके,रुद्र जगताप तीन रौप्य पदके,श्रीराज निकम एक सुवर्णपदक,तसेच शौर्य ढगे व रुद्र ढगे यांनी सहभाग नोंदवला.या सर्व विद्यार्थ्यांना स्कूलचे क्रीडाशिक्षक अमोल ठोंबे यांचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांचे स्कूलचे प्राचार्य अशोक बेरड यांनी अभिनंदन केले. व त्यांना पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page