अहमदनगर (दि.११ डिसेंबर):-नगर तालुक्यातील शेंडी ग्रामपंचायत येथील तलाठी पदावर कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याला तब्बल ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची माहिती समोर येत आहे.
गजराज नगर येथे पैसे घेत असताना पथकाने तलाठ्याला रंगेहात पकडले असून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.