अहमदनगर (दि.१२ डिसेंबर):-नेवासा तालुक्यातील गळनिंब येथील खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी,फिर्यादी श्री.प्रमोद संभाजी कापसे (रा.सुरेगांव, ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांचा मित्र प्रविण सुधाकर डहाळे (रा.गळनिंब,ता.नेवासा) यास आरोपी नामे 1)शेखर अशोक सतकर, 2)माऊली उर्फ अरुण दत्तात्रय गणगे 3) अशोक उर्फ खंडु किसन सतकर सर्व रा.सुरेगांव, ता. नेवासा,4) दिपक सावंत पुर्ण नांव माहित नाही 5) ईश्वर पठारे रा.वरखेड,ता.नेवासा, 6) जालींदर बिरुटे रा.सदर,व इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी मागील भांडणाचे कारणावरुन तलवार,कोयते, लोखंडी रॉड,लाकडी दांडक्याने मारहाण करुन जिवे ठार मारले.
या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं.1028/2023 भादवि कलम 302,307, 143,147,148,149 सह आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करणेकामी पथक नेमुण समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थागुशा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन खुन करणारे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.पथक नेवासा तालुक्यामध्ये आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे शरद कुंडलिक ढोकणे हा माळीचिंचोरा या ठिकाणी येणार असुन तो कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकाने लागलीच माळीचिंचोरा शिवार, ता. नेवासा या ठिकाणी सापळा रचुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णनाचा संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव शरद कुंडलिक ढोकणे रा.गोपाळपुर, ता.नेवासा, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले.त्यांचे कडे वर नमूद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे,पोहेकॉ/ज्ञानेश्वर शिंदे, पोना/रविंद्र कर्डीले,संदीप दरंदले,फुरकान शेख,पोकॉ/बाळासाहेब खेडकर,किशोर शिरसाठ,चालक सफौ/ उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.