आम आदमी पक्षाच्या शितलताई कांडेलकर यांच्या गाडीची मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी केली तोडफोड
पुणे प्रतिनिधी (दि.१३ डिसेंबर):-पुणे जिल्ह्यातील विमान नगर येथील आम आदमी पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या शितलताई कांडेलकर यांच्या गाडीची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली.
यावेळी शितलताई कांडेलकर म्हणाल्या की गेल्या वर्षभरापासून मी विमान नगर भागात लोकांचे वेगवेगळे सामाजिक प्रश्न सोडवत आहे. नागरिकांच्या अडीअडचणी वेळ न पाहता सोडवत आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशुळ उठला आहे म्हणूनच माझ्या गाडीची फोडतोड केली आहे.
विमान नगर पोलीस स्टेशनला याबाबत कांडेलकर यांनी रीतसर तक्रार दिली आहे. आरोपींच तपास करून तात्काळ अटक करण्याची केली मागणी.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे हे करत आहे.